स्थानिक

बारामती पालखी महामार्गावर चारचाकी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात;दुचाकी स्वाराचे धड अन् शीर झाले वेगळे!

दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बारामती पालखी महामार्गावर चारचाकी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात;दुचाकी स्वाराचे धड अन् शीर झाले वेगळे!

दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर खराडेवाडी नजीक शिर्सुफळ फाट्यावर १० जुलै रोजी रात्री साडेदहा दरम्यान अपघाताची भीषण घटना घडली. या घटनेत विशाल रामचंद्र कोकरे या दुचाकीस्वाराचा, तर चारचाकी चालक अजित लक्ष्मण लगड याचाही मृत्यू झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार टाटा टिगोर कंपनीची कार दौंडकडून बारामतीकडे निघाली होती.

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, एका दुचाकीस्वराचे शीर उडून दुसऱ्या बाजूला पडले.

बारामती-पाटस मार्गावरील शिर्सुफळ फाट्यावर हा अपघात घडला आहे. अमित लक्ष्मण लगड (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) आणि विशाल रामचंद्र कोकरे (वय ३४, रा.धुमाळवाडी पणदरे, ता. बारामती) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बारामती-पाटस मार्गावरील शिर्सुफळ येथे कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत कार चालक व दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी स्वाराचं धड आणि शीर वेगळं झालं होतं, तर कार मध्ये घुसलेली दुचाकी अक्षरशा क्रेनने ओढून बाहेर काढावी लागली.

Related Articles

Back to top button