इंदापुरात प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी
गायकवाड यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला.

इंदापुरात प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी
गायकवाड यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला.
इंदापूर; प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काळं फासण्याची घटना घडल्यानंतर इंदापूरमध्ये त्यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आज इंदापूर शहरात बहुजन समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत गायकवाड यांना पाठिंबा जाहीर केला.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या प्रकारामागे इंदापूरमधील शिवधर्म फाउंडेशनचे पदाधिकारी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज बहुजन समाजातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
प्रवीण दादा गायकवाड आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.प्रवीण दादा अंगार है, बाकी सब भंगार है.अशा जोरदार घोषणा देत निषेधकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला आणि गायकवाड यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला.