बारामतीचं राजकारण बदलणार?;’या’ नेत्याच्या भाजपा प्रवेशामुळे साहेब,दादा,ताई चिंतेत
पुणे ग्रामीणमध्ये भाजपाला त्यांचा पाया आणखी मजबूत करता येईल.

बारामतीचं राजकारण बदलणार?;’या’ नेत्याच्या भाजपा प्रवेशामुळे साहेब,दादा,ताई चिंतेत
पुणे ग्रामीणमध्ये भाजपाला त्यांचा पाया आणखी मजबूत करता येईल.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्रात एनडीएचे सरकार असले तरीही सत्ताधारी आघाडीतील मित्रपक्षांमध्ये वेळोवेळी तणाव निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी जिल्हाध्यक्षपदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत चर्चा रंगली होती.
जगताप यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केला. या पक्षांतरानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी चिंताग्रस्त असल्याचे दिसते.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, संजय जगताप यांच्या पक्षबदलामुळे पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसू शकतोत, कारण त्यांच्या भाजपामधील प्रवेशामुळे पुणे ग्रामीणमध्ये भाजपाला त्यांचा पाया आणखी मजबूत करता येईल. याआधी या भागात भाजपाची पकड मजबूत मानली जात होती.
पुण्यात काँग्रेसचा प्रभाव कमी होत आहे
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पुणे हा बऱ्याच काळापासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. मात्र, शरद पवार यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर या भागातील त्यांची पकड कमकुवत झाली. असं असताना पुण्यात काँग्रेसचा प्रभाव अजूनही जाणवतो. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. पुण्यात काँग्रेसला लोकसभा किंवा विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही, तर २०१९ मध्ये पुण्यात काँग्रेसचे तीन आमदार विजयी झाले होते.
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले की, काँग्रेसमधील निष्ठावंत कुटुंब पक्ष सोडून जात आहेत ही चिंतेची बाब आहे. पक्ष नेतृत्वाला याचा विचार करावा लागेल. संघटनेचे खूप नुकसान झाले आहे आणि काँग्रेसची विचारसरणी सोडून राजकारणात आपले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
नऊ वर्षे पुणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी
संजय जगताप हे नऊ वर्षे पुण्यात काँग्रेस पक्षाचा प्रमुख चेहरा होते. २०१६ मध्ये त्यांची पुणे काग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. भाजपामध्ये जाण्याच्या फक्त दोन दिवस आधी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. भाजपामध्ये सामील होण्याबाबत एका स्थानिक काँग्रेस नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “काँग्रेसने जगताप यांच्यावर एवढा विश्वास ठेवला की त्यांच्याकडे नऊ वर्षे पक्षाची कमान होती. आता ते पक्ष सोडून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये गेले आहेत. ते बराच काळ पुण्यात काँग्रेसच्या सर्वोच्च पदावर असल्याने त्यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे.”
बारामतीतील राजकारणावर भाजपा कसा ताबा मिळवत आहे?
आतापर्यंत अपेक्षित यश मिळालेले नसले तरी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव कऱण्याचा भाजपा कायम प्रयत्न करत आहे, म्हणूनच पुण्याच्या राजकारणात प्रभाव असलेल्या अशा राजकीय कुटुंबांना भाजपा आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. २०१९ मध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पक्षात सामील करून घेण्यास भाजपा यशस्वी ठरले होते. मात्र, २०२४ मध्ये ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपा पुण्यात आपला पाया मजबूत करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजपाने तीन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले सागरम थोपटे यांना पक्षात सामील करून घेतले. हे पुण्यातील एक प्रभावशाली राजकीय कुटुंब आहे.
संजय जगताप आता भाजपामध्ये सामील झाले आहेत, तेसुद्धा पुरंदरच्या एका प्रभावशाली राजकीय कुटुंबातील आहेत. भाजपामध्ये सामील झाल्यानंतर संजय जगताप म्हणाले की, “आमच्या कुटुंबाचा नेहमीच काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास होता. मात्र, गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. आम्हाला असं जाणवलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सर्वांना सोबत घेत प्रगती करत आहे.”
महत्त्वाचे मुद्दे:
- संजय जगताप यांचा भाजपामध्ये प्रवेश
- त्यांच्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता
- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय स्थलांतर महत्त्वाचं मानलं जातं
- संजय जगताप यांचा अनुभव व स्थानिक पातळीवरचा प्रभाव भाजपा साठी लाभदायक ठरू शकतो
- संजय जगताप यांना पुढे काय जबाबदारी दिली जाते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे
गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपा बारामतीमध्ये पवार कुटुंबाच्या बालेकिल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने रासपचे धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले होते. मात्र, त्यांचा फार थोड्या फरकाने पराभव झाला. २०१९ मध्ये भाजपाने तत्कालीन रासप आमदार कांचन कुल यांच्या पत्नीला उभे केले होते, मात्र त्यांनाही यश मिळवता आले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नीने निवडणूक लढवली होती, मात्र सुप्रिया सुळेंना त्या पराभूत करू शकल्या नाहीत.
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली. तिथे जगताप आणि थोरात कुटुंब प्रभावशाली मानली जातात. या भागातही भाजपा कमकुवत पक्ष आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने खडकवासला आणि दौंड इथल्या जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीने बारामती, इंदापूर आणि भोर जागा जिंकल्या. पुरंदर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने विजयाचा झेंडा फडकवला. आता बारामती लोकसभेच्या सहापैकी चार जागांवर भाजपाचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांसाठी ही चिंतेची बाब असणं सहाजिकच आहे. राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नेत्याने याबाबत सांगितले की, “त्यांना बदलत्या राजकीय परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांची पकड टिकवून ठेवण्यासाठी ते पुरेसे कणखर आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पाया आणखी भक्कम करायचा आहे. भाजपाही तेच करत आहे.
शिंदे सेनेला काय धोका आहे?
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे आठ विधानसभेच्या जागा आहेत, तर शिंदे सेनेकडे फक्त एकच जागा आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या जागेवर संजय जगताप यांचा पराभव केला होता. आता संजय जगताप भाजपामध्ये सामील झाले आहेत. विजय शिवतारे आणि शिवसेनेला त्यांच्याकडून अप्रत्यक्ष धोका आहे