कामगारांच्या पाठीशी शिवसेना कायम भक्कम साथ देणार : खासदार अरविंद सावंत
शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांचे आयोजन

कामगारांच्या पाठीशी शिवसेना कायम भक्कम साथ देणार : खासदार अरविंद सावंत
शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांचे आयोजन
इंदापूर; प्रतिनिधि
कामगार संघटनांनी राज्यातील ग्रामीण भागात विशेषत: शेतमजूर, उसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी काम केले पाहिजे. संघटनेत आपण कामगार नेते असलात तरी नियमित कामावर लक्ष ठेवून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहणे महत्वाचे आहे. प्रत्येक काम जबाबदारीने करा,प्रत्येक प्रकारचे काम करण्याची तयारी ठेवा. अशा वेळी व्यवस्थापन देखील तुम्हाला फायदे मिळवून देण्यात मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आज कामगारांना संदेश दिला.भारतीय कामगार सेनेच्या वतीने पुण्यात आयोजित हॉटेल व आदरातिथ्य क्षेत्रातील कामगार प्रतिनिधींच्या कार्यशाळेत ते आज बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, की“आजकाल जाहिरातीचे युग आहे, त्याचा विचार करून कामाचा प्रवाह वाढवा. आता उद्योगांमध्ये vendar सिस्टीम आली आहे; त्यामुळे कामगार वर्ग फायदे घेऊ शकत नाही 20 वर्षांहून अधिक काल काम करणारे कामगार हंगामी कामगार म्हणून काम करत आहेत. गिरणी कामगार लढ्यात श्रीपाद अमृत डांगेसारख्या डावी विचारसरणी असलेल्या नेत्याचे नेतृत्व मान्य करून कामगारांनी संप सुरु ठेवला. मात्र त्यांच्या एकाच आदेशात त्यानंतर तडजोड करण्यास तयार झाले. एक रुपया पगार वाढ घेऊन संप मागे घेतला.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी कामगार प्रश्नावर अधिक प्रभाविपणे काम सुरु ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली. गिग वर्कर्स आणि platform workers साठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कामगार क्षेत्रातील तज्ञांची मदत घेऊन अधिक जोरकस पद्धतीने काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
यावेळी कामगार सेना नेते अजित साळवी, मनोहर भिसे, हॉटेल क्षेत्रातील तज्ञ चंदन कुमार, सौमित्र कंडू, दीपाली सिंघल, कायदेतज्ञ श्रीनिवास इनामती यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले.