इंदापूर

इंदापूर नगरपरिषद स्वच्छतेत ‘टॉप गियर’वर..

देशात पाचवा राज्यात नंबर 1

इंदापूर नगरपरिषद स्वच्छतेत ‘टॉप गियर’वर..

देशात पाचवा राज्यात नंबर 1

इंदापूर;प्रतिनिधि

स्वच्छ भारत अभियानाचं फलित दिसू लागलंय! स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये इंदापूर नगरपरिषदेने थेट देशात पाचवा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावून इतरांना मागं टाकलंय. 20 ते 50 हजार लोकसंख्या गटातील 1581 शहरांमध्ये इंदापूरने ही किमया साधली आहे.

नगरपरिषदेच्या यशानंतर कर्मचाऱ्यांनी मैदानातच फटाके फोडले, पेढे वाटले आणि यशाचा जल्लोष साजरा केला.

कचरामुक्त थ्री स्टार आणि ODF प्लस ही खास मानांकनं मिळवून इंदापूरने आपली ओळख देशपातळीवर ठसवली आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शहरवासीयांचा हा एकत्रित विजय असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं.

काम बोलतंय..गेल्या काही वर्षांत इंदापूर नगरपरिषदेकडून स्वच्छतेच्या क्षेत्रात भक्कम पावलं उचलली गेली. कचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियंत्रण आणि जनजागृतीच्या मोहिमा यामुळे शहराने झपाट्यानं बदल घडवला.

Related Articles

Back to top button