इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे सापडला कोरोनाचा रुग्ण.
पुणे मुंबई सारख्या हॉटस्पॉट ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्तीमध्येच होत आहे लागण.
इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे सापडला कोरोनाचा रुग्ण.
पुणे मुंबई सारख्या हॉटस्पॉट ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्तीमध्येच होत आहे लागण.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
सध्या इंदापूर तालुक्यात मुंबई पुणे या कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लागण होत असलेली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
पुणे या ठिकाणावरून इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे आलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झालेले आहे.
सदरचा इसम पुणे येथून आपल्या मूळ गावी बावडा येथील गणेशवाडी या ठिकाणी 22 जून रोजी आला होता. तो व्यक्ती पुण्यामध्ये एका खाजगी कंपनीत कामगार असल्याची प्राथमिक माहीती समोर आली असून दि.२५ जून रोजी या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आज दि.२७ रोजी या व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. सध्या या रुग्णाच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या आहेत याचा शोध प्रशासना कडून घेतला जात आहे.संबंधित परिसर कंटेंन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे.