स्थानिक

श्री जवाहर शहा वाघोलीकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ रोपांचे वितरण

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

श्री जवाहर शहा वाघोलीकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ रोपांचे वितरण

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बारामती वार्तापत्र 

श्री जवाहर  शहा वाघोलीकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ रोपांचे  वितरण गुरुवार  दिनांक 24 जुलै 2025 रोजी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष श्री जवाहर  शहा वाघोलीकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल मधील पहिलीच्या विद्यार्थ्यांना ८१ बेलाच्या रोपांचे  वितरण करण्याचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य अविनाश जगताप यांच्या हस्ते मुलांना या रोपांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. योगिनी मुळे, आय क्यू ए सी  समन्वयक डॉ. अरुण मगर, वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. भगवान माळी, विभागातील सहकारी प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ.प्रणाली वडेर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Back to top button