
इंदापुरात क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू
32 व्या वर्षी निधन
इंदापूर;प्रतिनिधि
क्रिकेट खेळत असताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना इंदापूर बाह्यवळण मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला गलांडवाडी नं.2 हद्दीत शुक्रवारी सायंकाळी घडली. किरण युवराज चव्हाण (वय 32वर्षे, रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मावसभाऊ विठ्ठल महाडीक यांनी पोलिसांना माहिती दिली. क्रिकेट खेळत असताना किरण यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तेथे असलेल्या काही तरुणांनी उपचारासाठी इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून उपजिल्हा रुग्णालय घेऊन जाण्यास सांगितले. या वेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी किरण यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.