स्थानिक

माजी सैनिकांच्या वतीने कारगिल दिन साजरा

जीवनातील फक्त १० मिनटं देशासाठी

माजी सैनिकांच्या वतीने कारगिल दिन साजरा

जीवनातील फक्त १० मिनटं देशासाठी

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका जय जवान आजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने शनिवार दि.२६ जुलै रोजी कारगिल दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे, जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर व सोपानराव बर्गे, राहुल भोईटे, नंदकुमार पिसाळ, एनसीसी प्रमुख महेश गोसावी ,सोमेश्वर माजी सैनिक संघटना अध्यक्ष कृष्णा कोळेकर
व बारामती तालुक्यातील सर्व माजी सैनिक व कुटूंबीय उपस्तीत होते.

सैनिकांचे बलिदान म्हणजे देशासाठी खूप मोठे योगदान असून त्यांचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे व कठीण परिस्थितीमध्ये यश खेचून आणणे म्हणजेच कारगिल दिन होय असे प्रतिपादन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.

कुटुंबाची परवा न करता देशासाठी अहोरात्र लढणारा प्रत्येक सैनिक म्हणजे भारतीयांचा खरा हिरो असून ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांचे कधीही विस्मरण होता कामा नये त्यांच्या शूर पराक्रमामुळे आपण संरक्षित आहोत हीच भावना कायमस्वरूपी ठेवावी व हीच खरी श्रद्धांजली कारगिल मधील हुतात्म्यांसाठी असल्याचे आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव निंबाळकर यांनी सांगितले

या प्रसंगी सोपानराव बर्गे ,राहुल भोईटे, नंदकुमार पिसाळ यांनी कारगिल युद्धाच्या आठवणी सांगितल्या.

ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूलच्या एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली ,देवगिरी अकॅडमी जळोची, विद्या प्रतिष्ठान छात्र सैनिक यांनी संचलन मध्ये सहभाग घेतला.
पेन्सिल चौक येथून भव्य दुचाकी रॅली काढून शारदा शारदा प्रांगण येथील शहीद स्तंभाला अभिवादन करण्यात आले. रवींद्र लडकत यांनी आभार व्यक्त केले.

चौकट:
कागरील दिनाचे निमंत्रण सांगून सुद्धा बारामती नगर परिषद , पोलीस प्रशासन मधील अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दहा मिनिटे उपस्तीत राहून आजी माजी सैनिक यांच्या बद्दल व देशाबद्दल प्रेम दाखवत नाही परंतु कोरोना मध्ये , विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी व मतदान साठी आजी माजी सैनिक यांची आठवण काढली जाते.
जीवनातील फक्त १० मिनटं देशासाठी व सैनिकांसाठी देऊ शकत नसल्याबद्दल सर्व सैनिकांनी निषेध व्यक्त केला.

Related Articles

Back to top button