विद्या प्रतिष्ठान चे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक मिळवला.

विद्या प्रतिष्ठान चे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक मिळवला.
बारामती वार्तापत्र
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील एकूण सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
सहा विद्यार्थ्यांपैकी चि.सर्वेश पद्माकर धर्माधिकारी याने ३०० पैकी २८२ गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक मिळवला. चि.श्लोक विनायक देवकाते २५८ चि.आदित्य लहू मुंडे २५२ कु.अनुष्का सुरेश नवले २५० गुण, चि.शार्दुल सुभाष शिंदे २४४ गुण, चि.दर्शन शहादेव अवंतकर २४२ गुण.
वरील विद्यार्थ्यांमधील चि.सर्वेश पद्माकर धर्माधिकारी आणि चा चि.आदित्य लहू मुंडे या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय येथे देखील निवड झाली आहे.वरील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली.
संस्थेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक यादव पी आर,उपमुख्याध्यापक कोरे पी एम, पर्यवेक्षक रकटे एन बी,चांदगुडे वाय ए तसेच इतर शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन केले मलगुंडे एस ए,श्री.चव्हाण सचिन पवार ए आर,कोकाटे आर बी , नेवसे , जाधव हर्षदा,जाधव वर्षा,उत्पात एस एस ,परकाळे,,पवार पी,चौधर पी ,काटे ए एच यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.