
धनगर समाज बांधवांचे आंदोलन.
शहर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन.
बारामती वार्तापत्र .
धनगर समाजाविषयी सोशल मिडियावर अपशब्द वापरलेल्या व्यक्तींविरुध्द भावना दुखावल्याची कारवाई करावी. तसेच, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनीही समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी आज धनगर समाज बांधवांच्या वतीने केली गेली.
याबाबत धनगर समाज बांधवांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना निवेदन दिले.
त्यात म्हटले आहे की, गुरुवारी (ता. 25) संध्याकाळी औदुंबर पाटील यांनी धनगर समाजाचे निवेदन स्विकारले, पण गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. तसेच, नीलेश धालपे यांना शिवीगाळ केली व अभिजित देवकाते यांनाही दमदाटी केली.
या संदर्भात कारवाई व्हावी, या मागणीसाठी आज अभिजीत देवकाते, नीलेश धालपे, संपतराव टकले, अॅड. अमोल सातकर, अॅड. दिलीप धायगुडे, सुधाकर पांढरे, सतीश फाळके, पांडुरंग कचरे, नवनाथ मलगुंडे, वैभव सोलनकर, काकासाहेब बुरुंगले, भीवा मलगुंडे, महेश कोकरे, अमोल घोडके, विशाल गावडे, रणजित गटकळ आदी उपस्थित होते.