कृषी

अजित पवारांचे विश्वासू शिलेदार ते नवे कृषिमंत्री; कोण आहेत दत्तात्रय भरणे?

दत्ता भरणे यांचे शिक्षण आणि संपत्ती

अजित पवारांचे विश्वासू शिलेदार ते नवे कृषिमंत्री; कोण आहेत दत्तात्रय भरणे?

दत्ता भरणे यांचे शिक्षण आणि संपत्ती

बारामती वार्तापत्र 

काल मंत्रीमंडळात बदल करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना कृषीमंत्री पदावरुन काढून टाकण्यात आले असून त्यांच्याकडे क्रिडा खाते देण्यात आले आहे.

तर आता कृषीमंत्रीपदी इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांची वर्णी लागली आहे. दत्ता भरणे यांना कोणताही राजकीय वारसा लाभलेला नाही. दत्ता भरणे यांचा सामान्य कार्यकर्त्यापासून ते मंत्रीपदाचा हा प्रवास चांगला आहे.

दत्ता भरणे यांचा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास

दत्ता भरणे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही. दत्ता भरणे यांना अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जाते. त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदाची धुरा सांभाळली. त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालकपदी काम करण्याचीही संधी मिळाली.

यानंतर त्यांनी भवानीनगरच्या श्री धत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी काम केले. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी बंडखोरी करुन निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाली. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.

दत्ता भरणे यांनी आपल्या कामामुळे गावागावांमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्यांनी २०१४, २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळवला. २०२४ मध्येदेखील त्यांनी बाजी मारली. सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले.

दत्ता भरणे यांचे शिक्षण 

दत्ता भरणे यांचा जन्म १५ एप्रिला १९६९ मध्ये झाला. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. दत्ता भरणे यांनी आपले प्राथमिक शिक्षण भरणेवाडी येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ कॉमर्स पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी साखर कारखान्याचे संचालकपदी काम करत राजकारणात प्रवेश केला.

दत्ता भरणे यांची संपत्ती 

दत्ता भरणे यांच्या नावावर एकूण १,००,००० रुपये आहेत तर पत्नीच्या नवावर १,५०,००० रुपये आहेत. बँकेत आणि इत्तर वित्तीय संस्थांमध्ये १,६८,२२४ रुपयांची ठेवी आहे.त्यांचे कंपन्यांमध्ये रोख रक्कम, शेअर्स आहेत. छत्रपती सह. सा. का भवानीगर येथे ५१००० रुपयांचे शेअर्स आहे. सोनाई दूध या ठिकामी २५००० रुपये आहेत. त्यांच्या नावावर अनेक कंपन्यांने शेअर्स आहेत. त्यांच्या नावावर लाखो रुपयांची शेतजमीन आहे. याचसोबत त्यांनी पुण्यातदेखील घर आहे.

Related Articles

Back to top button