![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/06/266df82c-6b4d-47d7-b299-1e0a2b4f6f1c-780x470.jpg)
उजनी धरणात पाणी साठा वाढला.
तेरा दिवसात ६.१८ टक्क्याने वाढ झाली आहे.
बारामती : वार्तापत्र
पुणे सोलापूर व नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या व पाणी साठ्यात एक नंबर ला असलेले उजनी धरणात गेल्या तेरा दिवसात ६.१८ टक्क्याने वाढ झाली आहे.
उन्हाळ्यात ज्यावेळी सोलापूर जिल्ह्यास पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते त्यावेळी उजनी धरणाची पाणी पातळी वजा(मायनस) मध्ये गेले होते, १३ जून रोजी जेव्हा पाणी बंद करण्यात आले, त्यावेळी उजनी धरणात उपयुक्त साठा वजा(मायनस) ९.६३ टी. एम. सी. होता तर उपयुक्त पाण्याची एकूण टक्केवारी वजा (मायनस)१७.९७ एवढी होती,पण मागील काही दिवसात भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाला आहे.
पुणे परिसर तसेच भीमा नदीच्या खोऱ्यात पर्जन्यामुळे उजनीत दौंडजवळून पाणी मिसळू लागले आहे उजनी धरणात दौंडजवरुन पाण्याची आवक होत असून यामुळे गेल्या काही दिवसात उजनीत ६.१८ टक्क्यांनी पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.