
बारामतीतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे व मित्रपरिवार यांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी ज्येष्ठ मा.नगरसेवक किरण गुजर,मा. उप नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव राजेंद्र बनकर व किशोर मासाळ अभिजीत चव्हाण
शहर अध्यक्ष जय पाटील, अविनाश बांदल, तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे ,शुभम ठोंबरे मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलीस निरीक्षक विलास नाळे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वीय सहाय्यक सचिन यादव, रामराजे मुळीक , प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी हनुमंत पाटील , संभाजी होळकर, साधू बल्लाळ, बापू शेडगे,सुनील शिंदे
लहुजी वस्ताद क्रांती सेनेचे पदाधिकारी, मातंग एकता आंदोलनाचे पदाधिकारी,
बारामती इंदापूर फलटण दौंड आदी परिसरातून मोठ्या संख्येने अण्णाभाऊ साठे विचार मंचाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी व नवीन पिढी शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी विविध उपक्रम जयंती निमित्त राबवत असल्याचे बिरजू मांढरे यांनी सांगितले.
दहावी बारावी व स्पर्धा परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
साईच्या सेवा ट्रस्ट लहुजी वस्ताद दहीहंडी संघ श्रीहरी तेलंगे मित्र मंडळ जय भवानी मित्र मंडळ आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार धनंजय तेलंगे यांनी मानले.