बजाज फायनान्स विरोधात गुन्हा दाखल.
कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा.
बारामती:वार्तापत्र बारामती मधी बजाज फायनान्स विरोधात शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा.रजि.नं.326/2020 भा.द.वि. कलम 452,385,506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉ-भास्कर विलासराव जेधे देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी- सिध्दार्थ चव्हाण.अजित कुंभार व एक अणोळखी व्यक्ती यांनी बारामती हॉस्पीटल मध्ये डॉ जेधे याना हप्ता भरण्यास दमदाटी केली.
दरम्यान रिझर्व बॅक ऑफ इंडीया बॅकेने सर्व बॅका व फायनान्स कंपन्या यांना सर्व कर्जदार याचे कर्जाचे हप्ते कोरोना काळात अॅॅगस्ट 2020 पर्यत वसुल करू नयेत असे आदेष दिलेले असताना बजाज फायनान्स कंपनीस मी सध्या कर्जाचे हप्ते भरू शकत नाही रिझर्व बॅकेने दिलेल्या सुचना प्रमाणे मी अॅगस्ट 2020 नंतर नीयीमत प्रमाणे कर्जाचे हप्ते भरेल अषा विषयाचा इमेल पाठवला होता.
त्यानंत एकदोन वेळा फायनान्स कंपनीतुन अनोळखी नंबर वरून मला कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फोन करून त्रास दिला व दि 24/06/2020 व 25/06/2020 रेजी बजाज फायनान्स कंपणीचे रिकव्हरी मॅनेजर सिध्दार्थ चव्हाण यांनी मला फोन करून व सिध्दार्थ चव्हाण.अजित कुंभार व एक अणोळखी व्यक्ती यांनी मी काम करीत असलेल्या बारामती हॉस्पीटल येथे अनाधिकाराने प्रवेष करून येवुन कर्जाचे हप्ते भरण्यासाठी माझेवर दबाव आणुन आमचे वसुलीचे काम आहे.
वसुली कषी करायची ते आम्हाला माहीत आहे. आम्ही तुमचे जगणे मुष्कील करून टाकु अषी धमकी दिली आहे म्हणुन माझी बजाज फायनान्स कंपनी त्याचे कर्मचारी सिध्दार्थ चव्हाण.अजित कुंभार व एक अणोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.