१ जुलै ‘डॉक्टर्स डे’ निमित्त रेडिओ रागिनी वरून आरोग्य जागर.
विविध वैद्यकीय तज्ञ भेटणार व शंका निरसन होणार.
१ जुलै ‘डॉक्टर्स डे’ निमित्त रेडिओ रागिनी वरून आरोग्य जागर.
विविध वैद्यकीय तज्ञ भेटणार व शंका निरसन होणार.
बारामती:वार्तापत्र भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून १ जुलै हा दिवस ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. ४ फेब्रुवारी १९६१ साली डॉ विधान चंद्र रॉय यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यामुळे भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ डॉक्टर विधान चंद्र रॉय बहाल करण्यात आला ..१ जुलै १९६२ सालापासून भारतामध्ये सर्वत्र डॉकटर्स डे साजरा केला जातो.
या अनुषंगाने १ जुलै ‘डॉक्टर्स डे’ निमित्त रेडिओ रागिनी वरून विविध क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहभागावर आधारीत विशेष कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येणार आहे.
यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर वर्गाचा चा समावेश आहे. यानिमित्ताने रेडीओ वरून ‘डॉक्टर्स डे’ बद्दल माहिती तसेच देशव्यापी कार्यरत असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती , कोरोना संसर्गजन्य परिस्थिती .. कोरोनाकाळातलं मानसिक आरोग्य.. मास्क वापरण्याच्या पद्धती, कोरोना काळात घ्यावयाची काळजी.कोरोना व मानसिक आरोग्य, कोरोना व बाल आरोग्य..कोरोना तपासणी आणि गैरसमज…त्वचेची निगा कशी राखावी.. जेष्ठ नागरिकांचा आरोग्य.. चाळिशीनंतर स्त्री आरोग्य समस्या… आरोग्य विमाबाबतीत नागरिकांनी घ्यावयाची दक्षता…. विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने डॉ अशोक तांबे. डॉ विभावरी सोळुंके, डॉ. अपर्णा घालमे, डॉ. स्नेहलता पवार, डॉ. दीपिका कोकणे, डॉ.आसावरी डॉ.डोंबाळे, डॉ. संतोष घालमे,डॉ. आजिनाथ खरात, डॉ. हर्षवर्धन व्होरा, डॉ. दिनेश ओसवाल, डॉ. सौरभ मुथा,डॉ. सुजित अडसूळ या वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रसारण दि.१ जुलै रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत होणार असून श्रोत्यांना ते मोबाईल वर रेडीओ रागिनी अप च्या माध्यमातून ‘डॉक्टर्स टॉक’ या सदरात ऐकायला मिळणार आहे.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.अमरसिंहपवार(संचालक ,बारामती हॉस्पिटल व माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन) यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गजन्य काळात नागरिकांना आरोग्याबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी, या अनुषंगाने या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत असल्याचे डॉ. विभावरी सोळुंके(अध्यक्षा, इंडियन मेडिकल असोसिएशन)यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाची निर्मिती ही रेडिओ रागिनी च्या संचालिका राजश्री आगम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी आर जे पूजा, आर जे सैजल यांचे सहकार्य लाभले.