शैक्षणिक

वंजारवाडी मध्ये इस्रो,नासा मध्ये निवड झालेल्या विद्यार्थी चा सन्मान

१० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले

वंजारवाडी मध्ये इस्रो,नासा मध्ये निवड झालेल्या विद्यार्थी चा सन्मान

१० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले

बारामती वार्तापत्र

दि.३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी येथे ग्रामपंचायत वंजारवाडी व स्नेहबंध प्रतिष्ठानच्या वतीने इस्रो आणि नासा निवड चाचणी परीक्षेच्या द्वितीय राऊंड मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व १० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.जिल्हा परिषद शाळा वंजारवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांन शालेय साहित्य वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

ग्रामपंचायत वंजारवाडीच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शहा यांचा सत्कार सरपंच जगन्नाथ वणवे यांच्या हस्ते सचिव सौ. अनिता काटकर यांचा सत्कार उपसरपंच सौ चिन्मयनंदा नितीन चौधर यांनी व सौ स्मृती शिंदे यांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ सुरेखा भालेराव यांनी केला, प्रतिष्ठानचे क्रियाशील सदस्य मेजर अनिल कायगुडे यांचा सत्कार विद्यमान सदस्य सागर दराडे यांनी केला, तसेच सदस्य डॉ.युवराज जराड पाटील सत्कार विद्यमान सदस्य गोरख चौधर यांनी केला.

यावेळी स्नेहबंध प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत वंजारवाडी चे ग्रामपंचायत अधिकारी निलेश लव्हटे, गावचे पोलीस पाटील पोपट राजाराम चौधर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष चौधर, जिल्हा परिषद शाळा वंजारवाडी अध्यक्ष सौ ज्योती वणवे, जि.प शाळा वंजारवाडी मा. अध्यक्ष संतोष चौधर, अशोक सूर्यवंशी, ग्रामस्थ पोपट जगताप, संदीप मालुसरे, व ग्रामस्थ उपस्तीत होते.
स्नेहबंध प्रतिष्ठानच्या वतीने सचिन वणवे आणि सौ अभिजीता जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. आभार वनिता भुतकर यांनी मानले.

Related Articles

Back to top button