
तब्बल सोळा वर्षांनी भेटले जुने वर्गमित्र…
आयुष्यातील जुन्या आठवणी ताज्या
बारामती वार्तापत्र
तब्बल सोळा वर्षांनी झाले जुन्या 2008 2009 ची10 वी बॅच जिजामाता विद्यालय सराटी यांच्या माजी विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचा गेट-टुगेदर आपल्या धावपळीच्या जीवनात थोडीशी धावपळ सोडून जुने मित्र तब्बल सोळा वर्षांनी एकत्र येऊन त्यांनी जुनी शाळाच भरवली होती आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणी ताज्या करून प्रत्येकाने या कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमाला शिक्षक वृंद यांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
या कार्यक्रमाचे स्वागत हलगीच्या गजरात व गुलाबाचे फुल देऊन तसेच फ्रेंडशिप डे असल्यामुळे प्रत्येकाला फ्रेंडशिप बँड देऊनच त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच शिक्षक यांना भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना शिक्षकांचा उर भरून आला व पूर्वीचे शिक्षण आणि आताच शिक्षण यातील तफावत त्यांनी दाखवून दिली त्यांनी यावेळी सांगितले की पूर्वीची विद्यार्थी हे आज्ञा करक होते सहनशील होते परंतु आता ही सहजशीलता शिल्लक राहिली नाही त्यामुळे शिक्षणाचा दर्जा देखील घसरला आहे या कार्यक्रमाला प्राचार्य घोगरे सर, गायकवाड सर ,बोराटे सर, जाधव सर, चव्हाण सर तसेच भोसले मॅडम व देशमुख मॅडम यांनी हजेरी लावली व आपल्या काळातील असलेल्या या बॅच चे कौतुक भरभरून केले.
विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणी काढून त्यांनी पूर्ण विद्यार्थ्यांना नवीन उमेद व नवीन बळ जागृत करून दिले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी बोलताना आपण शिक्षकांच्या असणाऱ्या कलागुणामुळे आपण इथपर्यंत कस काय घडलं काहीजण युवा उद्योजक तर काहीजण बँकेत, कोणी लेखक कोणी शिक्षक शिक्षका झाले नोकरी लागले याचे सर्व श्रेय हे शिक्षकांना देण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रम आनंदी होण्यासाठी टेडी बियर यांनी कॉमेडी करणारे खास आकर्षण ठरले.
आपलेच सहकारी यांच्या वाढदिवसही साजरा करण्यात आला तसेच जेवणाची मस्त मध्ये मेजवानी, संगीत खुर्ची तसेच त्याला बक्षीस विजेत्या सुनीता कोकाटे मॅडम व मनोज मगर यांना विठ्ठलाची मूर्ती देण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांचे आभार मानले व कार्यक्रमाला आपल्या हजेरी लावली याबद्दल एकमेकांचे आभार व्यक्त केलेआणि आयुष्यात असा गेट-टुगेदर पुन्हा पुन्हा व्हावा हीच इच्छा मनात घेऊन विद्यार्थ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे योगदान अमोल कोकाटे व अभिजीत कोकाटे पाटील विजय भाऊ साठे यांनी अतोनात कष्ट घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले.