क्राईम रिपोर्ट
इंदापूर एटीएम फसवणूक – वयोवृद्धाचा एटीएम कार्ड बदलून तब्बल ५० हजारांचा गंडा, आरोपी अटकेत..
एटीएम कार्ड हुशारीने बदलले

इंदापूर एटीएम फसवणूक – वयोवृद्धाचा एटीएम कार्ड बदलून तब्बल ५० हजारांचा गंडा, आरोपी अटकेत..
एटीएम कार्ड हुशारीने बदलले
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील एका वयोवृद्ध नागरिकाची एटीएममध्ये फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र बँकेच्या इंदापूर शाखेतील एटीएममध्ये ज्ञानदेव सोपान दरेकर हे आपली खात्यातील शिल्लक रक्कम तपासत असताना, त्यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांचे एटीएम कार्ड हुशारीने बदलले. त्यानंतर काही क्षणांतच त्यांच्या खात्यातून तब्बल ५० हजार रुपये गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घाबरलेल्या दरेकर यांनी तत्काळ इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासांत प्रमोद यलमर या आरोपीला अटक केली.
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे