बारामती मध्ये जलसाक्षरता प्रशिक्षण संपन्न
एकूण ९ बॅच मध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षण देण्यात आले.

बारामती मध्ये जलसाक्षरता प्रशिक्षण संपन्न
एकूण ९ बॅच मध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षण देण्यात आले.
बारामती वार्तापत्र
केंद्र शासन जल शक्ती मंत्रालय, नवी दिल्ली, राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन कक्ष,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती, बारामती यांच्या माध्यमातून साईप्रेम ग्रामीण विकास संस्था, यवतमाळ (KRC L३) यांच्या वतीने जलजीवन मिशन टप्पा 4 अंतर्गत स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण विषयक प्रशिक्षण देण्यात आले.
बारामती तालुक्यातील हे प्रशिक्षण २२ जुलै ते २५ जुलै या कालावधीमध्ये शिर्सुफळ,उंडवडी सुपे, गुणवडी, कोऱ्हाळे बु , सुपे , होळ , खांडज या ठिकाणी एकूण ९ बॅच मध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यामध्ये बारामती पंचायतीचे आरोग्य विभाग विस्तार अधिकारी सुनील जगताप साहेब; सौ. प्राची घोडे गुणवडी सरपंच; सौ.वर्षा जाधव ग्रा. अधिकारी यांचा समावेश होता.
या प्रशिक्षणामध्ये बारामती तालुक्यातील एकूण ९८ ग्रामपंचायतीचा समावेश होता.
त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मधील पाच सदस्य अशा प्रशिक्षणार्थीना दोन दिवशी एक बॅच अशा पद्धतीने ९ बॅच मधून प्रशिक्षण देण्यात आले. प्रतिमा पूजनाने या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात होत असे. तसेच, प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण किट (माहिती पुस्तिका, नोट पॅड, पेन, कापडी पिशवी) वाटप करण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वाटप ही करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये दुपारचे जेवण व चहा ची सोय होती. हे प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रमेश भानवे सर, यांच्या मार्गदर्शना खाली उत्कृष्ट पद्धतीने पार पडले.
नानासाहेब सोनवणे, सौ.नयन सोनवणे, रविराज पाटील, सोमनाथ चव्हाण, सोपान हेगडे, राहुल चव्हाण, सौ.संगीता राऊत, जालिंदर काकडे, यशवंत लोणकर, लक्ष्मण पवार, गंगागिरी गिरी या प्रवीण प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच तालुका समन्वयक म्हणून राजेश गुंडाळे, सचिन कुचेकर, संग्राम नाळे यांनी काम पाहिले.
पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी ,नाहीतर होईल आरोग्याची हानी…जल व्यवस्थापन कृती आराखडा, जल जीवन मिशन योजना व भविष्यातील आव्हाने आणि विषयातून जलसाक्षरता विषयाचे महत्त्व गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवविण्याचे काम प्रशिक्षणाममधून करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, जलसुरक्षक, पाणीपुरवठा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी ही सहभाग घेतला.