स्थानिक

सेंचुरी वाईन्स च्या वर्धापन दीन उत्साहात संपन्न

स्थानिकांना रोजगार दिला

सेंचुरी वाईन्स च्या वर्धापन दीन उत्साहात संपन्न

स्थानिकांना रोजगार दिला

बारामती वार्तापत्र 

अधिकारी व कर्मचारी यांनी गेल्या २५ वर्षात महत्वपूर्ण दिलेले योगदान आणि संतुष्ट व समाधानी ग्राहक हीच आमची खरी ओळख असून ग्राहकांना उत्तम दर्जा आणि गुणवत्ता देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन सेंचुरी वाईन्स प्रा .लि .चे चेअरमन हनुमंत तांबे यांनी केले.

पिंपळी येथील सेंचुरी वाईन्स प्रा लिमिटेड या कंपनीचा २५ वा वर्धापन दिना निमित्त (शनिवार ०२ ऑगस्ट) आयोजित कार्यक्रमात हनुमंत तांबे मार्गदर्शन करत होते.

या प्रसंगी सेंचुरी वाईन्सचे संचालक संदीप तांबे ,संचालिका आशाताई तांबे व प्रा. आर. डब्ल्यू. जोशी, डॉ चंद्रकांत खानावरे शुगर फॅक्टरीचे टेक्निकल डायरेक्टर टी.एम.कर्णे, अतिरिक्त अधीक्षक विक्रीकर विभागचे प्रकाश पाटील, गोदिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, चार्टड अकाउंटंट रोहित रानडे, संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बारामती दिलीप शिंदे,पांडुरंग झगडे गुरुजी व्यवस्थापक विकास उदघट्टी आणि अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय आणि राज्यातील व इतर राज्यातील वाइनरी उत्पादक उपस्तीत होते.

२५ वा वर्धापन दिन हे केवळ निमित्त असून ग्राहकांनी दाखवलेला विश्वास ,दिलेली प्रेरणा व पाठींबा या मुळे यशस्वी व्यवसाय झालेला आहे व या पुढेही नवनवीन ग्राहक जोडत जाणार असल्याचे संचालक संदीप तांबे यांनी सांगितले.

सर्वसामान्य शेतकरी कौटुंबिक परिस्थिती असताना सुद्धा जिद्द, चिकाटी ,आत्मविश्वास या जोरावर शिक्षण घेऊन मुबंई, ठाणे परिसरात व्यवसायास संधी असताना सुद्धा हनुमंत तांबे यांनी आपल्या गावाकडील मातीशी इमान राखून व्यवसायाची गरुड झेप घेऊन स्थानिकांना रोजगार दिला व बारामती चे नाव व्यवसायाच्या माध्यमातून उज्वल केले असल्याचे विविध मान्यवरांनी मनोगत मध्ये सांगितले.

या प्रसंगी गुणवंत कर्मचारी यांचा कुटूंबा सहित सन्मान व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्रीनिवास परेश वाघमोडे, उत्कर्षा डोंबाळे,हर्षदा जमदाडे,कुणाल जमदाडे आणि साहसी बाईक राईडर्स रोहित शिंदे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले तर गायन सलीम सय्यद यांनी केले.

Related Articles

Back to top button