कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचा साधेपणा सर्वांसमोर; पंगतीत बसून घेतला महाप्रसादाचा आस्वाद
विकांना प्रेमाने भोजन वाढण्याचे पवित्र कार्य केले.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचा साधेपणा सर्वांसमोर; पंगतीत बसून घेतला महाप्रसामदाचा आस्वाद
विकांना प्रेमाने भोजन वाढण्याचे पवित्र कार्य केले.
इंदापूर;प्रतिनिधि
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा साधेपणा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गाव भरणे वाडी येथे बिरोबा मंदिरामध्ये आयोजित अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या महाप्रसाद कार्यक्रमात त्यांनी सर्वसामान्य जनतेसोबत एकत्र पंगतीत बसून भोजनाचा आस्वाद घेतला.
सामान्य माणसांप्रमाणेच, कोणत्याही औपचारिकतेविना थेट पंगतीत बसलेले कृषीमंत्री भरणे हे दृश्य उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरले.
त्यांच्या या विनम्र आणि साधेपणाच्या वृत्तीने ग्रामीण जनतेच्या मनात आणखी आदर निर्माण केला.
विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेत, पंगतीत उपस्थित भाविकांना प्रेमाने भोजन वाढण्याचे पवित्र कार्य केले. एका मंत्रीपदाच्या भारदस्त जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांनी अशा प्रकारे जमिनीवर येऊन सेवा केली, ही गोष्ट अनेकांच्या मनाला भावून गेली.
हा प्रसंग सामाजिक एकोपा आणि नम्रतेचे प्रतीक ठरला आहे. अशा प्रकारच्या कृतीतून लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेमधील अंतर कमी होण्यास मदत होते, हे या प्रसंगातून अधोरेखित झाले.