स्थानिक

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडळातील 15 हजार 460 ग्राहक ‘सौर’प्रकाशात

या योजनेचा लाभ घेण्यासाठी https:/// pmsuryaghar. gov. in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडळातील 15 हजार 460 ग्राहक ‘सौर’प्रकाशात

या योजनेचा लाभ घेण्यासाठी https:/// pmsuryaghar. gov. in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

बारामती वार्तापत्र 

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडळातील 15 हजार 460 घरगुती ग्राहक सौरप्रकाशात आले आहेत. या ग्राहकांनी एकूण 51.95 मेगावॅट क्षमतेची सौरछत (सोलर रूफ टॉप) यंत्रणा बसविली आहे.

बारामती मंडळातील 2 हजार 354 (8.13 मेगावॅट), सातारा मंडळातील 4 हजार 573 (क्षमता 14.5 मेगावॅट) तर सोलापूर मंडळातील 8 हजार 533 (29.31 मेगावॅट) ग्राहकांचा समावेश आहे. 8 हजार 77 ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. घरगुती ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत सौरप्रकल्पासाठी 2 किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रती किलोवॅटला 30 हजार रुपये, तर तिसर्‍या किलोवॅटला 18 हजार रुपये अनुदान मिळेल. अर्थात 1 किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, 2 किलोवॅटसाठी 60 हजार रुपये व 3 किलोवॅटसाठी 78 हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळेल.

1 किलोवॅट क्षमतेच्या सौरप्रकल्पाद्वारे वार्षिक सरासरीने मासिक सुमारे 120 युनिट वीजनिर्मिती होते. मासिक 150 युनिटपर्यंत वीज वापर असणार्‍या कुटुंबाला 2 किलोवॅट, तर मासिक 150 ते 300 युनिट वीजवापर असणार्‍या कुटुंबासाठी 3 किलोवॅट क्षमतेची सौरयंत्रणा पुरेशी ठरते. 1 किलोवॅट क्षमतेच्या सोलर रूफ टॉप यंत्रणेसाठी साधारणपणे 108 स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा आवश्यक आहे. त्याद्वारे वार्षिक सरासरीनुसार प्रत्येक महिन्याला 120 युनिट वीजनिर्मिती होते. मासिक वीज बिलात बचत होऊन गुंतविलेल्या रकमेची 4 ते 5 वर्षांत परतफेड मिळते. पॅनलची स्वच्छता राखणे, नियमित देखभाल दुरुस्तीमुळे सौरपॅनलची कार्यक्षमता व आयुर्मान वाढते.

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून घराच्या छतावर सौरछत (सोलर रूफ टॉप) यंत्रणा बसविलेल्या घरगुती ग्राहकांची बारामती मंडळाची विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

बारामती 1108, दौंड 834, सासवड 412 अशी आहे. सातारा मंडळाची विभागनिहाय आकडेवारी : कराड 1341, फलटण 664, सातारा 1879, वडूज 361, वाई 328 अशी आहे. सोलापूर मंडळाची विभागनिहाय आकडेवारी : अकलूज 777, बार्शी 1526, पंढरपूर 1809, सोलापूर ग्रामीण 1057, सोलापूर शहर 3364.

..अशी करा नोंदणी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी https:/// pmsuryaghar. gov. in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाइल अ‍ॅपही यासाठी उपलब्ध आहे. घराच्या छतावर सौरप्रकल्प बसवून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे घराची विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. वापराइतकी सौर वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य येते. अर्थात वीज मोफत मिळते. अधिकची निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

Related Articles

Back to top button