स्थानिक

ग्राम महसूल संघाच्या अध्यक्षपदी मयुरेश वाघमोडे व सचिवपदी आदेश निकम

ग्राम महसूल संघाच्या अध्यक्षपदी मयुरेश वाघमोडे व सचिवपदी आदेश निकम

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल संघ बारामती तालुका शाखा अध्यक्षपदी मयुरेश सुरेश वाघमोडे व सचिव पदी आदेश रविंद्र निकम यांची निवड होऊन कार्यकरणी जाहीर करण्यात आली.

बुधवार दि.०६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल संघ (ग्राम महसूल अधिकारी, तलाठी) यांची वार्षिक सभा सल्लागार एम. पी.सय्यद, दीपक कोकरे, चेतन पोळ, सुधीर बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली
बारामती तालुका कार्यकरणी
अध्यक्ष: मयुरेश वाघमोडे
सचिव: आदेश निकम
उपाध्यक्षा श्रीमती भाग्यश्री माळी, श्रीमती नीलम देशमुख, कार्याध्यक्ष दिगंबर घोरपडे ,श्रीमती पुनम गावडे, सहसचिव संदीप कांबळे ,खजिनदार गोरक्षनाथ इंगळे, सहसचिव राहुल केंद्रे, संघटक दत्तात्रय तलवार, श्रीमती प्रतिक्षा कोरपड, जिल्हा प्रतिनिधी विनोद धापटे ,गजानन पारवे आदींची निवड करण्यात आली.

सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना काम करतांना येणाऱ्या ऑनलाइन अथवा ऑफलाईन कामकाजातील अडचणी सोडविणे, विशेषतः नवीन जॉइन झालेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांना महसूल प्रशासनातील कामकाजाबाबत माहिती देणे,ग्राम महसूल प्रशासन लोकाभिमुख करून शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे,काम करताना येणाऱ्या अडचणीवर संघटितपणे एकत्र राहून मार्ग काढणे आदी बाबत काम करणार असून ग्राम महसूल अधिकारी यांच्या समस्या शासनाकडे मांडण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मयुरेश वाघमोडे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button