आपला जिल्हा

टी. सी. कॉजेज मध्ये फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन विजेत्यांना मिळणार रोख बक्षीस, जंगल सफारीची संधी

वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची संधी

टी. सी. कॉजेज मध्ये फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन विजेत्यांना मिळणार रोख बक्षीस, जंगल सफारीची संधी

वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची संधी

बारामती वार्तापत्र
जागितक छायाचित्रण दिनानिमित्त तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड
कम्युनिकेशन स्टडीजतर्फे थ्रू द फ्रेम्स फोटोग्राफी स्पर्धा २०२५ आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे हे अकरावे वर्ष असून विजेत्यांना रोख बक्षिसे, जंगल सफारी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची संधी मिळणार
आहे.
विद्यार्थी आणि खुला गट या दोन गटात स्पर्धा होणार असून व्यक्ती, ठिकाण आणि निसर्ग हे विषय
दिले आहेत. विद्यार्थ्यांसह व्यावसायिक फोटोग्राफर, फोटोग्राफीची आवड असणारी कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.
खुल्या गटातून पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तसेच कडबनवाडी ग्रासलँड सफारी टूर तर विद्यार्थी गटात प्रथम, व्दितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
स्पर्धकांना विभागाच्या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून ई मेल मार्फत १६ ऑगस्ट पर्यंत
फोटो पाठविता येईल.
स्पर्धकांच्या उत्कृष्ट फोटोंचे टी.सी कॉलेज कॅम्पस मध्ये मीडिया आणि कम्युनिकेशन
विभागात दि. १९ आणि २० ऑगस्ट रोजी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ते सर्वांसाठी खुले असणार आहे.
सर्वानी फोटोग्राफी स्पर्धेत सहभागी व्हावे आणि थ्रू द फ्रेम्स या प्रदर्शन भेट द्यावी असे आवाहन महाविद्यालयाचे डॉ.अविनाश जगताप यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button