फिरस्त्यांचा मेळावा ही महाराष्ट्रातील अनोखी संकल्पना: आनंद बनसोडे
बारामती ट्रेकर्स क्लब चा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

फिरस्त्यांचा मेळावा ही महाराष्ट्रातील अनोखी संकल्पना: आनंद बनसोडे
बारामती ट्रेकर्स क्लब चा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बारामती वार्तापत्र
फिरस्त्यांचा मेळावा ही अनोखी संकल्पना बारामती मध्ये होत आहे हे कौतुकास्पद असून व पर्यावरण आणि पर्यटन बदल जनजागृती व जगभर फिरा व जगाची माहिती घ्या असे प्रतिपादन जगाचा प्रवास करणाऱ्या जागतिक प्रवासी आनंद बनसोडे यांनी केले.
बारामती ट्रेकर्स क्लब चा सातवा वर्धापन दिनच्या निमित्ताने ( रविवार १० ऑगस्ट)
आयोजित करण्यात आलेल्या फिरस्त्यांच्या मेळाव्यामध्ये जगभरामध्ये प्रवास करणारे प्रवासी तसेच ऐतिहासिक गड किल्ले, ऐतिहासिक शहरे,पर्यटन स्थळे आदी ठिकाणी प्रवास करणारे प्रवासी,साहित्यिक, इतिहास प्रेमी,घुममकडं जिप्सी,ट्रेकर्स, मुशाफिर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवासी म्हणजे देवदूतच असतात, फिरस्त्या प्रवासांचा बारामती शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेला मेळावा ही एक अनोखी संकल्पना असून आजपर्यंत देशभरामध्ये जगभरामध्ये अनेक देशांमध्ये फिरलो परंतु असा अनोखा फिरस्त्यांचा मेळावा आज प्रथमच पाहत आहे असे सांगून त्यांनी या फिरस्त्यांचा मेळाव्याचं विशेष कौतुक करत,
घराचा उंबरा हेच जगातील सर्वात मोठे शिखर आहे आणि हे शिखर जो व्यक्ती पार करू शकतो तो जगातील सर्व शिखर सहज पार करू शकतो, प्रवास, भटकंती करत असताना आर्थिक गणित कसं जुळवायचं याच्याबद्दल देखील त्यांनी अत्यंत मार्मिक अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं, सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडे गावात सायकल पंक्टर काढणाऱ्या व्यक्तीचा मुलगा ते जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट शिखर करणारा एव्हरेस्ट वीर असा प्रवास संघर्षामय प्रवासाची गाथा फिरस्त्यांच्या समोर मांडली,२७ देशाचा प्रवास, एवरेस्ट सर करून सात माउंटन सर केले त्यासाठी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास हे गुण अंगी पाहिजेत असेही आनंद बनसोडे यांनी सांगितले.
बारामती ट्रेकर्स क्लबच्या वतीने इतिहासात नाहीशी झालेली परंतु अस्तित्वात असलेली कऱ्हा परिक्रमा करण्याचा मानस तसेच वेगवेगळी ऐतिहासिक मंदिर लेण्या यांच्यावरचा अभ्यास करण्याकरता अभ्यासी प्रवास दौरे पुढील काळामध्ये ट्रेकर्स क्लब च्या वतीने आयोजित करणार असल्याचे ॲड. सचिन वाघ यांनी सांगितले.
बारामती ट्रेकर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.