
‘अनेकान्त’च्या श्रेयांशचा आर्चेरीत सुवर्ण वेध
नामांकित नेमबाज सहभागी झाले होते.
बारामती वार्तापत्र
पुणे – नेमबाजीत अचूकता, एकाग्रता आणि जिद्दीच्या बळावर बारामती येथील अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता –
आठवीतील कु. श्रेयांश अतुल किर्वे या विद्यार्थ्यानी सी.बी.एस.ई.साऊथ झोन II आर्चेरी टूर्नामेंट २०२५ मध्ये सुवर्णपदक पटकावले.
के.जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, पुणे येथे ३ ऑगस्ट रोजी आयोजित या स्पर्धेत राज्यातील विविध
शाळांतील नामांकित नेमबाज सहभागी झाले होते. या स्पर्धेत श्रेयांशने नेमबाजीतील अचूकतेची पराकाष्ठा गाठत सर्वांना चकित केले.
या उत्कृष्ट कामगिरीमुळे श्रेयांशची पंजाब येथे २० सप्टेंबरला होणाऱ्या इंटरनॅशनल आर्चेरी स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष, सचिव, स्कूलचे चेअरमन, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि प्राचार्या यांनी श्रेयांशचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.