उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे ३० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे लोकार्पण
राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे ३० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे लोकार्पण
राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल -उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती वार्तापत्र
नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन देईल, स्वातंत्र्य दिनी मिळालेल्या या अमूल्य देणगीची जतन करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
नटराज नाट्य कला मंदिराच्या परिसरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या ३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर, रवींद्र लाड, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.