नंदिकेश्वर मंदिर विकासकामांचा शुभारंभ – कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे मामा यांचे प्रतिपादन
५ कोटी रुपये खर्चाच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन

नंदिकेश्वर मंदिर विकासकामांचा शुभारंभ – कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे मामा यांचे प्रतिपादन
५ कोटी रुपये खर्चाच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नंदिकेश्वर महाराज मंदिरात कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे मामा यांनी सहपत्नीक अभिषेक करून दर्शन घेतले.
या प्रसंगी मंदिर परिसरातील नीरा नदी पुरापासून संरक्षणासाठी ५ कोटी रुपये खर्चाच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन मा. भरणे मामा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. मंत्री म्हणाले की,
“१३-१४ व्या शतकात बांधलेले हे मंदिर आपल्या ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे प्रतीक आहे. पुढील पिढ्यांसाठी हे मंदिर अधिक आकर्षक आणि सोयीसुविधायुक्त स्वरूपात उभे करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. माझ्या कार्यकाळात समाजमंदिरे व ऐतिहासिक मंदिरे यांच्या जिर्णोद्धाराला नेहमीच प्राधान्य दिले आहे. नंदिकेश्वर क्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळवणे ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी सातत्याने पूर्ण करत आहे.”
मा. भरणे मामा पुढे म्हणाले की,
या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण पायाभूत सुविधा उभारणी व पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यात येतील. यामुळे केवळ भाविकच नव्हे, तर इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणावर ये-जा वाढेल. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन दगडवाडी परिसराचा सर्वांगीण विकास साध्य होईल. शासनाची भूमिका निधीपुरती मर्यादित नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग व सहकार्य यामुळेच ही कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.