बारामतीत सायबर जनजागृतीचा अनोखा उपक्रम ‘आला नवा जमाना मोबाईलचा दिवाना’ पटनाट्याने रसिकांना भुरळ
सोशल मीडियाचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी करावा

बारामतीत सायबर जनजागृतीचा अनोखा उपक्रम
‘आला नवा जमाना मोबाईलचा दिवाना’ पटनाट्याने रसिकांना भुरळ
सोशल मीडियाचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी करावा
बारामती वार्तापत्र
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर जनजागृतीचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. शरदचंद्रजी पवार, योगेंद्र पवार, ट्रस्टी नीलम गुज्जर, प्राचार्य डॉ. भरत शिंदे तसेच समन्वयक शिक्षक अक्षय भोसले सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘आला नवा जमाना मोबाईलचा दिवाना’ हे पटनाट्य सादर केले. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे होणारे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा गैरवापर, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठीची खबरदारी आणि सायबर सुरक्षेचे महत्त्व हे विषय विद्यार्थ्यांनी प्रभावी तसेच विनोदी शैलीत मांडले.
कार्यक्रमानंतर आ. शरदचंद्रजी पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले, “तंत्रज्ञानाचा वापर योग्य दिशेने करणे आजच्या तरुणांसाठी अत्यावश्यक आहे. सोशल मीडियाचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी करावा, त्यात वेळ आणि आयुष्य वाया घालवू नये.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली.
विद्यार्थ्यांचे प्रमुख प्रतिनिधी –
शिवानी चेडे – President
सागर मेरावी – Secretary
विनया लाखे – Activity Director
महेश कांडेकर – PR Media Director