एसटी बसमधून महिला प्रवाशाच्या पर्समधील दागिने आणि रोकड चोरी;पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल

एसटी बसमधून महिला प्रवाशाच्या पर्समधील दागिने आणि रोकड चोरी;पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल
इंदापूर,प्रतिनिधि
सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या एसटी बसमधून महिला प्रवाशाच्या पर्समधून रोख रकमेसह दागिने चोरट्याने लंपास केले आहेत.
यामध्ये रोख रकमेसह तब्बल ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश्री रेवणसिद्ध हुल्ले (वय ५४, रा. वाकड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. राजेश्री हुल्ले या शनिवारी (ता.१६) सकाळी ९.३० वाजता सोलापूर ते स्वारगेट या एसटी बस (क्र. एमएच १४, ६१५ पूर्ण नंबर माहिती नाही) ने निघालेल्या होत्या. सोलापूर ते पळसदेव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत एसटी बसमध्ये चोरट्याने त्यांच्या बँगमधील पॉकेटमध्ये असलेले एक लाख ५० हजार रुपये किमतीचे गंठन, प्रत्येकी ५० हजारांचे एक लॉकेट, एक ब्रेसलेट, प्रत्येकी २५ हजारांच्या दोन पिळ्याच्या अंगठ्या तसेच प्रत्येकी १५ हजार व १० हजार रुपयांच्या अंगठ्या आणि रोख ५ हजार रुपये असा एकूण ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. यावरून इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सचिन बोराडे करत आहेत.