अवैध गौण खनिजाच्या विरोधात आमरण उपोषण! उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली!
पंचनामा केला असून त्या ठिकाणी एकशे तेवीस ब्रास मुरूम साठा आढळून आला

अवैध गौण खनिजाच्या विरोधात आमरण उपोषण! उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली!
पंचनामा केला असून त्या ठिकाणी एकशे तेवीस ब्रास मुरूम साठा आढळून आला
इंदापूर, प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर मुरूम उत्खनन, वाहतूक व साठा करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात निमगाव केतकी येथील मंडल अधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी दि. १४ ऑगस्ट पासून आमरण उपोषण केले आहे.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी राऊत यांची तब्येत खालावली असून या उपोषण स्थळी कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात गौण खनिज बाबतचा विषय हा महसूल व वन विभागाकडून हाताळण्यात येतो यासाठी महाराष्ट्र गौण खनिज( विकास व विनियमन) २०१३ तयार करण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक परवाने देण्याची कार्यवाही करण्यात येत असते.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू व गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे वारंवार प्रकार घडत असल्याचे निदर्शनाचा येत आहेत त्यामुळे महसुलाची तसेच पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुद नवीन शासन निर्णय १७ जुलै २०२५ नुसार
केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितां विरोधात फौजदारी कार्यवाही करण्याची तरतूद महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे मात्र अशा अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या मलीद्या पोटी आतापर्यंत अनेक आंदोलन, उपोषण होऊनही एकदाही गुन्हे दाखल झाले नसल्याचे राऊत यांनी सांगितले.
सदर व्यक्तीस तलाठी व मंडळ अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पुणे प्राईम न्यूज शी बोलताना केला.
आहे.जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले उपोषणाच्या पाचव्या दिवशीही कोणता अधिकारी उपोषण स्थळी आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी संजय राऊत यांची प्रकृती खालावली असून याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर पाणी त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलण्याचा प्रयत्न केला असता. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
•••••••
सदर गौण खनिज उत्खननाचा पंचनामा केला असून त्या ठिकाणी एकशे तेवीस ब्रास मुरूम साठा आढळून आला आहे. तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. त्यावरती आज दि. १८ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आले आहे. त्या सुनावणीत जोड निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल.
मनीषा यादव
मंडल अधिकारी निमगाव केतकी