ज्येष्ठ नागरिक निवास मध्ये जागतिक डास दिन निमित्त मार्गदर्शन
कोरडा दिवस का पाळायचा याचे महत्त्व पटवून दिले

ज्येष्ठ नागरिक निवास मध्ये जागतिक डास दिन निमित्त मार्गदर्शन
कोरडा दिवस का पाळायचा याचे महत्त्व पटवून दिले
बारामती वार्तापत्र
बुधवार दि.२० ऑगस्ट रोजी बारामती शहरातील तांदुळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक निवास येथे जिल्हा हिवताप कार्यालय व आरोग्य विभाग पंचायत समिती बारामती यांच्या मार्फत ‘जागतिक डास दिन ‘ साजरा करण्यात आला यावेळी पंचायत समिती आरोग्य विभागाचे तालुका पर्यवेक्षक सौ.सावरकर आणि संदीप बालगुडे यांनी पावसाळ्यात होणाऱ्या किटकजन्य आजाराबाबत माहीती दिली.
मनोज कौले आणि आ.स.कांबळे यांनी जेष्ठ नागरिकांना परीसर स्वच्छते बद्दल माहिती दिली हिवताप, डेंग्यू, चिकणगुण्या,या आजारांची लक्षणे व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जेष्ठ नागरींकांना मार्गदर्शन केले .तसेच कोरडा दिवस का पाळायचा याचे महत्त्व पटवून दिले व डासउत्पती स्थानात गप्पी मासे का सोडायचे हे सांगितले .
यावेळी संस्थेतील निवासी, कामगार व संस्थेचे व्यवस्थापक गणेश शेळके उपस्थित होते.