
भव्य रॅलीतून रॅगिंग विरोधी जागरूकता
६० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात १२ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि समावेशक वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अँटी रॅगिंग समितीने “अवेअरनेस इन अॅ क्शन” या थीमसह अँटी-रॅगिंग दिन व अँटी-रॅगिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
अँटी-रॅगिंग दिन कार्यक्रमासाठी विद्या प्रतिष्ठानचे वसंतराव पवार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अतुल शहाणे , महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरूमठ, शैक्षणिक प्रभारी डॉ. शैलजा हारुगडे, अँटी रॅगिंग समन्वयक डॉ. अनंत शेरखाने हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
रॅगिंगचा अर्थ, रॅगिंगविरोधात सरकारची पावले, रॅगिंग विरुद्ध कायदे, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगच्या धोक्याला आळा घालण्यासाठी UGC विनियम, २००९ कायदे, रॅगिंगवर प्रतिबंधासाठी उपाययोजना, दिल्या जाणाऱ्या शिक्षा, विद्यार्थ्यांना रॅगिंगमध्ये सहभागी होण्याचे दुष्परिणाम या विषयी अतुल शहाणे यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाला सुमारे ६० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. श्रुती काळे, पाहुण्यांचा परिचय मेघा सूर्यवंशी तर आभार सुमित पाटील याने मानले. अँटी-रॅगिंग सप्ताहामध्ये रॅगिंग विरोधी जागरूकता पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रॅगिंग विरोधी जागरूकता रॅली यासह विविध उपक्रमांचे आयोजन केले स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
सर्व पोस्टर्स आणि रांगोळीचे परीक्षण रुई हॉस्पिटलच्या एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र सल्लागार पूजा खंबायत व प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नम्रता वाघमोडे यांनी ठरवलेल्या निकषांनुसार परीक्षकांसह केले. सर्वोत्तम तीन पोस्टर्स आणि रांगोळींना प्रमाणपत्रांच्या स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. इतर सर्व सहभागींनाही प्रमाणपत्रे देण्यात आली. या अँटी-रॅगिंग दिन व अँटी-रॅगिंग सप्ताहासाठी विद्या प्रतिष्ठानच्या सर्व मॅनेजमेंट कमिटीचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षण घेत असताना भितीमुक्त व अडचणी मुक्त शिक्षण घ्या आई-वडिलांचे व शिक्षकांचे नाव उज्वल करावे असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुमन देवरूमठ यांनी सांगितले
ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.