बारामती मध्ये जागतिक ‘फोटोग्राफर डे ‘ साजरा
सर्व फोटोग्राफरना व्यवसायातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले

बारामती मध्ये जागतिक ‘फोटोग्राफर डे ‘ साजरा
सर्व फोटोग्राफरना व्यवसायातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले
बारामती वार्तापत्र
जागतिक फोटोग्राफर मंगळवार १९ ऑगस्ट रोजी गौरी डिजिटल कलर लॅब मध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
बारामती तालुक्यातील ज्येष्ठ फ़ोटोग्राफर व फोटोग्राफी क्षेत्रामध्ये नवीन पदार्पण केलेले फोटोग्राफर यांचा सन्मान करण्यात आला.
फोटोग्राफी क्षेत्रातील तंत्रज्ञान आधुनिक होत आहे व दरवर्षी बदलत आहे यांचा अभ्यास फोटोग्राफर्स यांनी करणे आवश्यक असल्याचे गिरीश काळे , अजित स्वामी,अंकुश कातोरे,अर्जुन कदम, मनोज वाईकर गणेश पवार आदी फोटोग्राफर्स यांनी सांगितले.
दोन दिवसीय कार्यशाळा उपलब्ध करून देणारे किरण कुंभार यांनी सुद्धा यावेळी सर्व फोटोग्राफरना व्यवसायातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
ग्राहकांना गुणवत्ता दर्जा देत असताना कमी वेळेमध्ये जास्तीतजास्त फोटो व्हिडिओ अल्बम्स देत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा व सर्वांनी हे तंत्रज्ञान शिका ही काळाची गरज असल्याचे गौरी डिजिटल लॅब चे संचालक सचिन सावंत यांनी सांगितले.
आभार प्रदर्शन प्रशांत कुचेकर यांनी केले