
बारामती हिंदू खाटीक समाजाचे आमरण उपोषण सुरूच
उपोषणाचा आज सातवा दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष
बारामती वार्तापत्र
हिंदू खाटीक समाजाविषयी बेताल वक्तव्य केल्यामुळे आमदार अर्जुन खोतकर यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी स्वातंत्र दिनापासून बारामती प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर हिंदू खाटीक समाजाकडून बेमुदत उपोषण केल जात आहे.या उपोषणाला आता खाटीक समाज परिवर्तन संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.
बारामती प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर अर्जुन खोतकर यांच्या वरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बारामती हिंदू खाटीक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील इंगुले हे आमरण उपोषणाला बसले आहेत. सध्या त्यांचे प्रकृती खालावत चालली आहे.
या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.अद्यापपर्यंत या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने हिंदू खाटीक समाज बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.दोन दिवसात अर्जुन खोतकर यांवर एफ आय आर दाखल न झाल्यास राज्यभर प्रत्येक चौकात अर्जुन खोतकर यांची पुतळे जाळले जातील तर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आमरण उपोषण केले जातील असा इशारा हिंदू खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
बाईट : संजय बबन महोलकर