राजकीय

बारामती लोकसभा मतदारसंघात तब्बल १७ हजार बोगस मतदार? ….

निरनिमगाव सरपंचांचा पुराव्यानिशी खळबळजनक दावा....

बारामती लोकसभा मतदारसंघात तब्बल १७ हजार बोगस मतदार? ….

निरनिमगाव सरपंचांचा पुराव्यानिशी खळबळजनक दावा….

गावोगावी बाहेरगावचे व अल्पवयीन मतदार नोंदले गेल्याचा धक्कादायक खुलासा….

बारामती वार्तापत्र 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप केल्यानंतर आता पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निरनिमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे.

इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव या एका गावात 200 पेक्षा अधिक बोगस मतदार आढळून आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. तालुक्यात तब्बल 17 हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा दावा प्रताप पाटील यांनी केला असून त्याबाबतचे काही पुरावे देखील पाटील यांनी सादर केले आहेत.एवढेच नव्हे तर या मतदारांनी लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांत मतदान केलं असल्याचा आरोप ही पाटील यांनी केलाय.

प्रताप पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटल आहे.

बाईट — प्रताप पाटील, सरपंच निरनिमगाव*

इंदापूरचे तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी यातील ७८ मतदार बोगस असल्याचे आदेश दिले होते, मात्र त्यांच्या बदलीपूर्वी आदेशावर सही होऊ शकली नाही. नवीन तहसीलदार जीवन बनसोडे यांनी मात्र या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

यात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वरकुटे व मलवडी येथील २४ जण,इंदापूर तालुक्यातील कळब येथील २८, कालठण नं. १ येथील ६, बोरीचा १,आटपाडीतील ३, कोंडीजचा १, उरुळी देवाचीचे ४,बारामतीतील पिंपळी व लिमटेक येथील ४,तसेच निरनिमगावात रहिवासी नसतानाही १०२ जणांची नावे मतदार यादीत नोंदलेली असून अल्पवयीन असलेले तब्बल ४० युवकांनी मतदान केल्याचे पुरावे पाटील यांनी सादर केले आहेत…

Related Articles

Back to top button