
‘अनेकान्त’ तायक्वांडो स्पर्धेत दैदिप्यमान विजय!
अनेकान्तच्या तायक्वांडो स्टार्सना सलाम !
बारामती वार्तापत्र
शारदानगर (माळेगाव) येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या तायक्वांडो क्रीडा स्पर्धेत अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूल, बारामतीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
सुवर्णपदक विजेते –
कु. रणविजय रणजीत इंगोले (इ. ७वी ‘क’)
कु. शरयू ज्ञानेश्वर माने (इ. ८वी ‘ब’)
या दोघांनी अत्यंत कौशल्यपूर्ण खेळ सादर करत सुवर्णपदक पटकावले
असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मानही पटकावला
आहे.
रौप्यपदक विजेता –
कु. अनुदर्शन मिलन साळुंके (इ. ८वी ‘ब’)
कांस्यपदक विजेते –
कु. साईराज अमोल खलाटे (इ. ७वी ‘क’)
कु. श्लोक विकास शिंदे (इ. ७वी ‘क’)
याशिवाय, कु. विक्रांत किरण खलाटे याने उत्कृष्ट कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला व शाळेचा गौरव वाढवला.
कु. अनुदर्शन मिलन साळुंके (इ. ८वी ‘ब’)
कांस्यपदक विजेते –
कु. साईराज अमोल खलाटे (इ. ७वी ‘क’)
कु. श्लोक विकास शिंदे (इ. ७वी ‘क’)
याशिवाय, कु. विक्रांत किरण खलाटे याने उत्कृष्ट कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला व शाळेचा गौरव वाढवला.
अनेकान्तच्या तायक्वांडो स्टार्सना सलाम !
या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. विशाल हडंबर सर
यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक मेहनतीचा आणि
विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा हा सर्वोत्कृष्ट परिणाम आहे.
संस्थेचे अध्यक्ष, सचिव, स्कूलचे चेअरमन, शाळा व्यवस्थापन समितीचे
सदस्य आणि प्राचार्या यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.