खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे व निविष्ठा वेळेत उपलब्ध – तालुका कृषी अधिकारी
बियाणे प्रकल्पाचा लाभ फक्त १० हेक्टरपर्यंत

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे व निविष्ठा वेळेत उपलब्ध – तालुका कृषी अधिकारी
बियाणे प्रकल्पाचा लाभ फक्त १० हेक्टरपर्यंत
बारामती वार्तापत्र
खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल व तुर आदी पिकांची बियाणे वेळेत उपलब्ध झाली असून तालुक्यातील चारही मंडळांमार्फत शेतकऱ्यांना वितरण करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांना ही बियाणे वेळेत मिळाल्याने नियोजनबद्ध पेरणी करता आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली आहे.
या बियाणे प्रकल्पाचा लाभ फक्त १० हेक्टरपर्यंत मर्यादित असून संपूर्ण गावांना बियाणे वाटप करता येत नाही. हे बियाणे शेतकरी गटांनाच उपलब्ध करून देण्यात आले असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी आवश्यक असल्याचेही श्री. हाके यांनी सांगितले.
बियाण्यांबरोबरच जैविक निविष्ठा व बीज प्रक्रिया साहित्य देखील वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या गोदामांमध्ये किटक सापळे थोडे उशिरा प्राप्त झाले असले तरी तेही नियोजनबद्ध पद्धतीने चारही मंडळांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आले आहेत.
खरीप हंगामातील सर्व प्रकल्पांतर्गत बियाणे व निविष्ठा वाटप पूर्ण झाले असून त्याची नोंदवही अद्ययावत करण्यात आली असल्याचेही श्री. हाके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
—