स्थानिक

भावजय इन नणंद आऊट! बारामती मेडिकल कॉलेजच्या नेतृत्वात बदल:खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदावरून हटवले; सुनेत्रा पवार अध्यक्षपदी

पदाचा कार्यकाळ हा दोन वर्षांसाठी असतो.

भावजय इन नणंद आऊट! बारामती मेडिकल कॉलेजच्या नेतृत्वात बदल:खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदावरून हटवले; सुनेत्रा पवार अध्यक्षपदी

पदाचा कार्यकाळ हा दोन वर्षांसाठी असतो.

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती अभ्यागत मंडळावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी आता खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०२१ साली महाविकास आघाडी सरकार असताना सदर मंडळावर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आहे. अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षा म्हणून आता सुनेत्रा पवार काम पाहणार आहेत. या पदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो.

मंडळातील सदस्य:

सुनेत्रा अजित पवार (अध्यक्ष), ज्योती नवनाथ बल्लाळ, डॉ. कीर्ती सतीश पवार, डॉ. सचिन कोकणे, ॲड. श्रीनिवास वायकर, डॉ. दिलीप लोंढे, अविनाश गोफणे आणि बिरजू मांढरे या नऊ सदस्यांची या मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती होती, पण आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांची तयारी?

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यसभेच्या तालिका सभापती निवड करण्यात आली. तर आता बारामती मेडिकल कॉलेजच्या अभ्यागत मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सक्षम पर्याय म्हणून सुनेत्रा पवार यांना अजित पवार पुढे आणत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी मी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे निवडणूक होई दिली ही माझी चूक झाली असे म्हटले होते. पण बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या रुपाने नवा पर्याय तयार करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या पदाच्या जबाबदाऱ्या काय?

1) अंमलात असलेले नियम व आदेश यांच्या चौकटीमध्ये राहून रुग्णालयाच्या व्यवस्थापनांत सुधारणा करण्यासाठी मार्ग व साधने तयार करणे.
2) निरनिराळ्या कामासाठी व विभागांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक तरतूदींचा योग्य प्रकारे चापर होत आहे किंवा नाही यायर देखरेख ठेवणे.
3) रुग्णालयाच्या संबंधिच्या जनतेच्या तक्रारीचा अभ्यास करणे व त्याचे निवारण होण्यासाठी करावयाच्या पध्दतीबद्दल शिफारस करणे,
4) रुग्णालयातील कर्मचारी वर्गाची अनियमित उपस्थिती, अवक्तशीरपणा व गैरवर्तन इत्यादींबाबत आ घेणे व त्यांत सुधारणा व्हावी म्हणून शिफारस करणे.
5) रुग्णालय परिसराची तपासणी करणे, सर्वसाधारण कामकाजांचा अभ्यास करणे व दोष आढळल्यास ते दूर करण्यासाठी उपाय सुचविणे,
6) रूग्णालयासाठी जनतेकडून देणग्या निमंत्रित करणे, गोळा करणे व स्विकारणे व राज्य शासनास रुग्णालयांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही अशा विशेष बाबींसाठी त्या उपयोगात आणणे, कोणती देणगी स्विकारण्यामध्ये अथवा तिचा रुग्णालयासाठी उपयोग करताना अंमलात असलेल्या नियमांचा व आदेशांचा भंग होता कामा नये.
7) वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समितीच्या कामकाजामध्ये आवश्यक त्या पध्दती विहीत करणे व इतर आवश्यक त्या गोष्टी करणे.
8) आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अमंलबजावणीचा आढावा घेणे.

Related Articles

Back to top button