क्राईम रिपोर्ट

बारामती धक्कादायक प्रकार; ‘मी आता आत्महत्या करीत आहे,’ असे सांगत पतीने घरातील पंख्याला गळफास

६ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

बारामती धक्कादायक प्रकार; ‘मी आता आत्महत्या करीत आहे,’ असे सांगत पतीने घरातील पंख्याला गळफास

६ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

बारामती वार्तापत्र 

माहेरी असलेल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करीत, ‘मी आता आत्महत्या करीत आहे,’ असे सांगत पतीने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला.

प्रतीक दत्तात्रय भारती (मूळ रा. जिंती, ता. करमाळा, जि. सोलापूर; सध्या रा. तांदूळवाडी, बारामती) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात प्रसाद दत्तात्रय भारती यांनी खबर दिली. प्रतीक भारती यांचा 4 महिन्यांपूर्वीच विवाह झाला. ते शेटफळगढे येथे बारामती अ‍ॅग्रोमध्ये दोन वर्षांपासून कामाला होते.

ते पत्नीसह बारामतीत एका भाडोत्री सदनिकेत राहत होते. त्यांची पत्नी वैष्णवी ही रक्षाबंधनापासून माहेरी शिरूर येथे गेली होती. त्यामुळे प्रतीक हे जिंती येथूनच कामावर ये-जा करीत होते. दि. 5 सप्टेंबर रोजी त्यांनी पत्नी वैष्णवी यांना व्हिडीओ कॉल केला.

‘मी आता आत्महत्या करीत आहे,’ असे म्हणत त्यांनी कॉल कट केला. वैष्णवीचा भाऊ प्रतीक गिरी यांनी ही माहिती प्रसाद यांना दिली. त्यानुसार ते मित्र गणेश भालेरावला सोबत घेऊन बारामतीत प्रतीक राहत असलेल्या सदनिकेच्या ठिकाणी आले.

तेथे त्यांनी खोलीत प्रवेश केला असता प्रतीकने पंख्याला गळफास घेतलेला दिसून आला. शेजारी राहणार्‍या लोकांना बोलावून घेत त्यांनी गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरविला. रुई ग्रामीण रुग्णालयात तो नेण्यात आला. तेथील डॉक्टरांनी प्रतीक मृत झाल्याचे घोषित केले.

Related Articles

Back to top button