
केमिकल फ्री अन्नाची गरज:उपमुख्यमंत्री अजित पवार
‘केमिकल फ्री ‘ अन्नाची गरज
बारामती वार्तापत्र
शेतीचे प्रमाण कमी होत असताना प्रत्येकास अन्न व भाजीपाला केमिकल फ्री मिळावा म्हणून शेतकरी व ग्राहक यांनी पुढाकार घेऊन प्रकल्प उभे करावेत तरच मानवाचे आरोग्य उत्तम राहील . प्रत्येकास ‘केमिकल फ्री ‘ अन्नाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
गुरुवार ४ सप्टेंबर रोजी
नीलम किसान न्यूट्रीमार्ट या ऑरगॅनिक शॉपीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी अजित पवार बोलत होते.
या प्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, मा.अध्यक्ष संभाजी होळकर,माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव मा. नगरसेवक नगरसेवक जयसिंग देशमुख,अमर धुमाळ, महाराष्ट्र क्रीडाई चेअरमन प्रफुल्ल तावरे, खजिनदार सुरेंद्र भोईटे बारामती क्रीडाई चेअरमन दत्तात्रय बोराडे, बारामती क्रीडाई वुमन विंग अध्यक्ष डॉ स्मिता बोराडे ,जिजाऊ संघाचे अध्यक्ष स्वाती ढवाण, आर के बाजारचे उद्योजक मनोज डुंबरे, किसान उद्योग समूहाचे गोकुळ देवरे, गुळ उत्पादक हेमनाथ नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
केमिकल फ्री पदार्थ विक्री करणे धकाबुकीच्या जीवनामध्ये जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे त्यामुळे गंभीर अशा आजारांना माणसांना सामोरे जावे लागत आहे हे डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांना भेसळ विहिरीत पदार्थ कसे मिळतील याचा प्रयत्न या शॉपी मधून होणार असल्याचे राजेंद्र खराडे, निलेश दोरगे, नीलम दोरगे, शारदा खराडे यांनी सांगितले .