हायवा टिप्पर सह १५३ अवजड वाहनांवर बारामती वाहतूक शाखेची धडक कारवाई..
१५३ वाहनांवर कारवाई; तब्बल १ लाख ५८ हजार दंड आकारण्यात आला.._

हायवा टिप्पर सह १५३ अवजड वाहनांवर बारामती वाहतूक शाखेची धडक कारवाई..
१५३ वाहनांवर कारवाई; तब्बल १ लाख ५८ हजार दंड आकारण्यात आला.._
बारामती वार्तापत्र
शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा विचार करून बारामती वाहतूक शाखा अवजड वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवत आहे. ही मोहीम दिनांक २७ जुलै २०२५ ते ९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत चालवण्यात आली.
महिनाभरापूर्वी १६ क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर केलेल्या कारवाईनंतर डंपर, टिपर, काँक्रिट मिक्सर, मल्टी एक्सेल ट्रक, प्रायव्हेट बस अशा अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नियमभंग करणारी अनेक वाहने आढळली. त्यामध्ये काही टिपर वाहने थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयात ताब्यात घेऊन ठेवण्यात आली. जोपर्यंत दंड भरला जात नाही किंवा कागदपत्रे सादर केली जात नाहीत तोपर्यंत ती वाहने मुक्त करण्यात आलेली नाहीत. वाहतूक शाखेच्या पथकाने परवाना जवळ नसणे, नो-एन्ट्री झोनमध्ये प्रवेश करणे, वाहन धोकादायक स्थितीत चालविणे, वाहन विमा नसणे, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र नसणे, फॅन्सी नंबरप्लेट लावणे आदी नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. या मोहिमेत तब्बल १५३ वाहनांवर कारवाई करून १ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बेशिस्त वाहतुकीत शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बारामती शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक शाखेने अनेक योजनांची आखणी केली आहे. आवश्यकतेनुसार विविध उपक्रम राबवले आहेत. व्याख्याने व शिबिरांमधून वाहन चालकांना मार्गदर्शन केले आहे. टुकार वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठी अनेक वेळा धाडसी कारवाया करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोहिमा यशस्वी पार पडल्या आहेत. ‘वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहन चालवताना सर्व कागदपत्रे जवळ बाळगा आणि सुरक्षितता पाळा,’ असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपनिरीक्षक सुभाष काळे वाहतूक शाखेचे पोलीस जवान प्रदीप काळे अजिंक्य कदम दत्तात्रय भोसले आकाश कांबळे प्रज्योत चव्हाण यांनी केली आहे.