उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत पाणीटंचाई; उद्यापासून दिवसाआड पाणी
नागरिकांनी पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत पाणीटंचाई; उद्यापासून दिवसाआड पाणी
नागरिकांनी पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तन बंद झाले आहे. उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली.
निरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने व उपलब्ध पाणीसाठा मर्यादीत असल्याने पर्यायाने पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवावा लागणार आहे. शुक्रवारी (दि. 12) शहरातील म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिध्दार्थनगर, विठ्ठलनगर, जवाहरनगर, पोष्ट रोड, हंबीर बोळ छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड विजयनगर, साईगणेशनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस इंदापूर रोड, एस.टी. स्टैंड परिसर, सटवाजीनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयूरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड वसंतनगर, अवधुतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी विवेकानंदनगर अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, महादेव मळा, सदगुरुनगर.. पतंगशाहनगर, मेडद रोड, क्षत्रियनगर, श्रावण गल्ली, कोष्टी गल्ली, तांदुळवाडी वेस चौक, सिध्देश्वर गल्ली, मारवाड पेठ, महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक कसाब गल्ली कचेरी रोड परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
शनिवार (दि. 13) संपूर्ण कसबा, फलटण रोड, रेणुकानगर, मुल्लावस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायणनगर, माळेगाव रोड हनुमाननगर माळेगाव कॉलनी, सातववस्ती शिवाजीनगर, जामदार रोड, कारभारीनगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, सुतारनेट, शाळा क्रमांक 2 परिसर पंचशिलनगर, साठेनगर. जगताप मळा, जुना मोरगाव रोड खंडोबानगर, नवीन मोरगाव रोड या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
नागरिकांनी पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करावा, निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू होईपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असे भुसे यांनी कळविले आहे.