स्थानिक

बारामती शहरातले शासकीय कार्यालय ठरत आहेत पार्किंगचा अड्डा..

ग्राउंड पार्किंग मध्ये तसेच कार्यालयांच्या आवारात कित्येक दिवस लावून ठेवले आहेत.

बारामती शहरातले शासकीय कार्यालय ठरत आहेत पार्किंगचा अड्डा..

ग्राउंड पार्किंग मध्ये तसेच कार्यालयांच्या आवारात कित्येक दिवस लावून ठेवले आहेत.

बारामती वार्तापत्र

अरुंद रस्ते आणि बेशिस्त वाहन चालक यामुळे बारामती शहरात पार्किंगची समस्या गंभीर होत आहे. रस्त्याच्या बाजूला पार्किंगला जागाच नसल्यामुळे आता लोकांनी शासकीय कार्यालयांच्या पार्किंग मध्ये घुसखोरी केली आहे.

विशेषता बारामती नगरपालिका आणि पंचायत समितीच्या पार्किंग मध्ये कर्मचाऱ्यांऐवजी नेतेमंडळी आणि पुढाऱ्यांच्याच गाड्या पार्किंग केल्या जात आहेत.

त्यामुळे बारामतीतली शासकीय कार्यालय आता पार्किंगचा अड्डा ठरतायेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे बारामती शहर बारामतीत अरुंद असल्याने पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, भिगवण रस्त्यावर ठराविक ठिकाणीच पार्किंगची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मात्र मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी किंवा भिगवन चौक परिसरातील कामे होईपर्यंत चार चाकी नेमकी कुठे लावायचा हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. त्यातच आता बारामती नगरपालिका आणि पंचायत समिती परिसरात लोकांना सोसायटीसमोर पण पार्किंगची गैरसोय होत असल्याने त्यांनी देखील आपल्या चार चाकी गाड्या नगरपालिका आणि पंचायत समितीच्या ग्राउंड पार्किंग मध्ये तसेच कार्यालयांच्या आवारात कित्येक दिवस लावून ठेवले आहेत.

Back to top button