बारामतीत १४ विमुक्त जमातींना अनुसूचित जमाती दर्जा मिळावा यासाठी लाक्षणिक उद्या दि. १५/९/२०२५ उपोषण
अनुसूचित जमाती (ब) असा दर्जा द्यावा, अशी मागणी केली.

बारामतीत १४ विमुक्त जमातींना अनुसूचित जमाती दर्जा मिळावा यासाठी लाक्षणिक उद्या दि. १५/९/२०२५ उपोषण
अनुसूचित जमाती (ब) असा दर्जा द्यावा, अशी मागणी केली.
बारामती वार्तापत्र
राज्यातील १४ विमुक्त आणि २८ भटक्या जमातींना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आज बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
ब्रिटिश काळात १८७१ सालच्या “गुन्हेगार जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत” या सर्व जमातींना सेटलमेंटच्या कुप्यात बंदिस्त केले होते.
त्याआधी त्या सर्व जमाती जंगलात राहून आदिवासी जीवन जगत होत्या, असे पुरावे शासन दप्तरी उपलब्ध आहेत. तरीदेखील या जमातींना अनुसूचित जमातीचा दर्जा न देता केवळ ओबीसी प्रवर्गात ५.५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
या संदर्भात भारतीय टकारी समाज संघाच्या वतीने आयोजित उपोषणात आमटा (टकारी), वडार, कैकाडी, रामोशी, पारधी आदी समाज बांधव सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी शासनाने या समाजांवरील अन्याय तात्काळ दूर करून त्यांना अनुसूचित जमाती (ब) असा दर्जा द्यावा, अशी मागणी केली.
आंदोलकांनी सांगितले की, “पन्नास वर्षांपासून विविध आंदोलने करूनही शासनाने न्याय दिलेला नाही. इतर राज्यांत या जमातींना एससी/एसटीमध्ये समाविष्ट केले आहे; मात्र महाराष्ट्रात मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आमचा संघर्ष सुरूच राहील.”