विमानतळाला लाजवेल असं बारामतीचा बस स्थानक अडकलं विद्रुपकरणाच्या विळख्यात
नागरिकांनी नाराजी व्यक्त

विमानतळाला लाजवेल असं बारामतीचा बस स्थानक अडकलं विद्रुपकरणाच्या विळख्यात
नागरिकांनी नाराजी व्यक्त
बारामती वार्तापत्र
एखाद्या विमानतळाला ही लाजवेल असं वर्णन केलेलं बारामतीचे बस स्थानक सध्या जाहिरात फ्लेक्सच्या विळख्यात अडकले आहे.
एकीकडे बारामती शहरातील फ्लेक्स हटवून विदृपीकरण रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा स्वतः प्रशासनाला सूचना करीत आहेत त्यातच बारामती बस स्थानकाच्या प्रमुखांकडून अनावश्यक ठिकाणी फ्लेक्स वर जाहिरात करून राज्यात नंबर एकच्या बस स्थानकाचे विद्रुपीकरण केले जात असल्याचा प्रकार समोर आलाय.
बारामती सह अन्य बस स्थानकावर जाहिरात करण्यासाठी रीतसर टेंडर करण्यात आले आहे. बारामती बस स्थानकात देखील अशा पद्धतीचे टेंडर करून एका खाजगी देण्यात आले आहे .
बारामती शहरातल्या नामांकित ज्वेलर्स कडून बारामती बस स्थानकाच्या प्रथमदर्शनी भागात भिंतींना खिळे ठोकून फ्लेक्स अडकविण्यात आले आहेत. वास्तविक पाहता परवाना देताना प्रवाशांना अडचण निर्माण होणार नाही, अशा जागेवर फ्लेक्स लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, बारामती बस स्थानकाच्या आगार प्रमुखांकडून संबंधित ज्वेलर्सला अभय दिल्याचे पाहायला मिळत आहे.
सुसज्ज इमारतीला खिळे ठोकून फ्लेक्स अडकवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असून एस टी महामंडळ याबाबत काय कारवाई करता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






