स्थानिक

बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुविधांचा अभाव; रुग्णांची होतेय हेळसांड, पहा विदारक सत्य..!

बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुविधांचा अभाव; रुग्णांची होतेय हेळसांड, पहा विदारक सत्य..!

प्रशासन नेमकं काय करतं

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुबलक निधी उपलब्ध करून देत अनेक सोईसुविधा दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात येथील रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून महाविद्यालय प्रशासन नेमकं काय करतं असा सवाल आता उपस्थित होत आहे.

या महाविद्यालयात एक अपंग रुग्ण जमिनीवरून घसरत जातानाचा प्रसंग बारामती वार्तापत्रच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या गलथानपणाचा नमुनाच या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, येथील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी रुग्णांना अपमानास्पद वागणूक देत उडवाउडावीची उत्तरे देता असा अनुभवही येथील रुग्ण सांगतात.

Back to top button