अनेकान्त स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा.
इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांने हिंदी भाषेचे महत्त्व ठामपणे मांडले

आला. या विशेष प्रसंगी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मन:पूर्वक सहभाग घेतला आणि हिंदी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात ‘सरस्वती पूजन’ आणि ‘शारदा स्तवना’ ने झाली. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या ‘हिंदी दिवस गीताने’ संपूर्ण परिसरात उत्साह आणि ऊर्जा पसरली.
इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांने हिंदी भाषेचे महत्त्व ठामपणे मांडले, तर इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्याने भाषेतील सखोल विचार मांडून सर्वांची मने जिंकली. “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती” ही प्रेरणादायी कविता इयत्ता ५ वीच्या विद्यार्थिनीने ज्या भावनाशील पद्धतीने सादर केली, त्याने संपूर्ण श्रोतागण भारावून गेले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी स्कूलच्या आदरणीया प्रधानाचार्या यांनी हिंदी भाषेचे राष्ट्रीय महत्त्व स्पष्ट करत, विद्यार्थ्यांना मातृभाषेसोबतच हिंदी भाषेचाही सन्मान करण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली, जिथे शिक्षक,विद्यार्थ्यांबरोबर सर्व सहकार्य करणाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात
आले.