बारामती शहरातले विद्रुपीकरण रोखण्यासाठी अजितदादांच पुढच पाऊल..
बिछाना धुतात म्हणून कॅनॉल मधल्या पायऱ्याच बुजून टाकल्या

बारामती शहरातले विद्रुपीकरण रोखण्यासाठी अजितदादांच पुढच पाऊल..
बिछाना धुतात म्हणून कॅनॉल मधल्या पायऱ्याच बुजून टाकल्या
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी तीव्र उपाययोजना अवलंबिल्या आहेत. नवरात्री च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक घरातला बिछाना धुवून निरा डावा कालव्याच्या परिसरात वाळत टाकत असतात त्यावर अजितदादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे विद्रूपीकरण रोखण्यासाठी अजित दादांनी आता चक्क कालव्यातील पायऱ्या बुजवण्याचा मार्ग अवलंबिला आहे. सध्या कॅनल मधील पायऱ्या बुजवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बारामतीतल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बारामती शहराचा सर्वांगीण विकास करताना शहरात कोणतेही प्रकारचे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा प्रशासनाला वारंवार सूचना देत असतात. शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी असे आदेशच दादांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, बारामती शहरातीले सर्वसामान्य नागरिक नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातला बिछाना कॅनॉल मध्ये धुवून त्याच परिसरात वाळत टाकत असतात. त्यामुळे शहरात विद्रूपीकरण वाढते असं अजित दादांचे मत आहे.
दादांनी याबाबत एका खाजगी कार्यक्रमात वक्तव्य देखील करून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बहुजन समाज पार्टीचे महासचिव काळुराम चौधरी यांनी अजितदादांच्या सहयोग निवासस्थानासमोर बिछाना जवळ टाकण्यात असल्याचा इशारा दिला होता.
त्यावर उपाययोजना करण्यासाठी अजितदादांनी आता चक्क कॅनल मधील पायऱ्याच बुजून टाकण्याचा तोडगा शोधला आहे.